Maval : सुनील शेळके गुरुवार ऐवजी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार!

एमपीसी न्यूज – भाजपने मावळातून उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेले तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी गुरुवार ऐवजी शुक्रवारी (दि. ४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कार्यकर्त्यांशी बोलताना जाहीर केले.

शेळके यांनी उद्या (गुरुवारी) वडगाव मावळ येथे भव्य शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती, मात्र रात्री भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्यानंतर शेळके यांनी उद्या (गुरुवारी) उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.

_MPC_DIR_MPU_II

आपण गेली पाच वर्षे मावळच्या जनतेची मनोभावे सेवा केली. त्यामुळे आपण विधानसभा निवडणूक लढवावी, हा जनतेचाच आग्रह आहे. केलेले काम व जनमताचा आदर करून भाजप उमेदवारीची संधी नक्की देईल, असे शेवटपर्यंत वाटत होते. पण आता पक्षाने पक्षाचा निर्णय जाहीर केला आहे. मावळच्या जनतेलाही आता तो समजला आहे. आपल्यासाठी जीवाचे रान करणारे कार्यकर्ते आणि जीवापाड प्रेम करणारी मावळची जनता यांच्याशी चर्चा करून करून आपण अंतिम निर्णय घेऊ, असे शेळके म्हणाले.

अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की अन्य पक्षाची उमेदवारी स्वीकारणार, या प्रश्नाचे थेट उत्तर देणे शेळके यांनी टाळले. मावळची जनता सांगेल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.