Talegaon : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनील दाभाडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माळवाडी (मावळ) येथील निष्ठावंत कार्यकर्ते सुनील तानाजी दाभाडे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

धनकवडी (पुणे) येथील पक्ष कार्यालयात पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी सुनील दाभाडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, माजी अध्यक्ष संतोष मुर्हे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, शरद कुटे आदी उपस्थित होते.

सुनील दाभाडे यांनी यापूर्वी आंदर मावळ विभाग अध्यक्ष व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. माळवाडी ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सदस्य आहेत. तालुक्यातील सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तळागाळापर्यंत पक्षाचे काम पोहोचवून पक्ष वाढीसाठी विशेष व प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सुनील दाभाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.