Sunil Gavaskar Turns 71 : सुनील गावसकर – कसोटीत 10 हजार धावा करणारा पहिला फलंदाज!

Sunil Gavaskar Turns 71: First batsman to score 10,000 runs in Tests; Sunil Gavaskar's 71st Birthday : बीसीसीआय आणि आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून सुनील गावसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावसकर आज आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटीत भारताकडून खेळताना 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे पहिले फलंदाज सुनील गावसकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत.

बीसीसीआय आणि आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून सुनील गावसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

‘विश्वचषक विजेता, 10 हजार कसोटी धावा करणारा पहिला फलंदाज, पदार्पण कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज दिग्गज सुनील गावसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे ‘बीसीसीआय’ने लिहिले आहे.

आयसीसीने सुनील गावसकर यांच्या विक्रमाची माहीती देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक फलंदाजीचे विक्रम नोंदविणारे सुनील गावसकर यांना सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. भारतीय खेळाडूंनी सुनील गावसकर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सुनील गावसकर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यांनी कसोटी कारकीर्दीत 125 सामने खेळले असून 51.12 च्या सरासरीने 10,122 धावा केल्या आहेत. तसेच 34 कसोटी शतकही झळकावली आहेत.

एकदिवसीय सामन्यात सुनील गावसकरने 108 सामने खेळले आणि 35.13 च्या सरासरीने 3,092 धावा केल्या आहेत. सुनील गावसकर हे 1983 च्या विश्वचषकात देखील सहभागी होते. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानाने गौरवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1