Chakan : सुनील पवार यांना कर्तव्यदक्ष पोलीस पुरस्कार

स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरस्कार वितरण

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.१५ ) पोलीस अधिकारी व पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. चाकण पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कर्तव्यदक्ष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचा विशेष पुरस्कार देऊन खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी सुनिल दहिफळे, विजय जगदाळे, विक्रम पासलकर, संजय निलपत्रेवार यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पत्रकार अविनाश दुधवडे, अशोक टिळेकर आदींनाही यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी चाकण पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अॅड. प्रकाश गोरे, सभापती प्रवीण गोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे सचिन वाघमारे, नियती शिंदे, शुभांगी शिंदे , उषा कांबळे, देवकी कडेकर, संगीता नाईकरे, रेबिका शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. रिपब्लिकन व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास पक्षाचे सर्व कार्यकर्तेही उपस्थित होते.

…म्हणून चांगले काम

सत्काराला उत्तर देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार म्हणाले की, पोलीस दलात काम करताना अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करतात असा अनुभव होता. आमदारांचा फोन आला की, याला सोडा, त्याला धरा असा आग्रह होत असल्याचा अनुभव होता. खेड तालुक्यातील चाकणमध्ये काम करताना प्रथमच लोकप्रतिनिधी यांनी पोलिसांच्या कामात अजिबात हस्तक्षेप न केल्याचा चांगला अनुभव आल्याचेही पवार यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.