Maval : मावळातील जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीत सदैव तुमच्याबरोबर – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – ‘मावळातील जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीत मी सदैव तुमच्याबरोबर राहीन’, असे वचन मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी दिले. 

लोणावळा परिसरातील भुशी, रामनगर, खोंडगेवाडी, सिद्धार्थनगरमध्ये शेळके यांनी आज सकाळी प्रचारफेरी काढली. सर्व ठिकाणी सुनीलआण्णांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. लोणावळ्यात सर्वच समजातील महिलांचा आण्णांना वाढता पाठिंबा असून प्रत्येक ठिकाणी सुनील शेळके यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येत होती. औक्षणासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. विविध संस्था-संघटनांनी शेळके यांना पाठिंबा जाहीर केला.

सुनील शेळके म्हणाले, ‘तुमच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये मी तुमच्या बरोबरीने असेन. लोणावळ्यात गेल्या दहा वर्षात त्यांनी जिल्हा रुग्णालय  बांधले नाही. फक्त आश्वासने दिली. चालू होते ते रुग्णालय देखील बंद झाले. लोणावळा येथील सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय सुरू करण्यासाठी मी वचनबद्ध आहे.’

विद्यमान आमदारांनी जनतेची कामे केली असती तर त्यांना लोणावळा येथे उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आणायची गरज पडली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

भुशी येथे सुरेश मराठे, स्वप्नील मराठे, योगेश येवले, संभाजी मराठे, उमेश मराठे, सागर मराठे, संतोष मराठे, सचिन मराठे, रूपेश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आण्णांचे स्वागत केले. मावळच्या जनतेने आपल्याला एक संधी द्यावी, असे आवाहन शेळके यांनी यावेळी केले. ‘भुशीमधील लोकांनी ज्या प्रमाणे माझ्यावर ढीगभर फुलांचा वर्षाव केला त्याचप्रमाणे त्यांच्या विकासाची कामे मी करून दाखवीन’, असेही ते म्हणाले.

रामनगरमध्ये एसआरपीचे अध्यक्ष अजय रोकडे, सुनील बेंगळे, अशोक शिंदे, सुरेश शिंदे, प्रदीप कांबळे, कपिल रोकडे, मंगेश गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारफेरीत सहभागी झाले होते. ‘रामनगरच्या लोकांना 20 वर्षे फक्त आश्वासन दिली गेली. मला एकच संधी द्या, रामनगरच्या लोकांना न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही’, असे शेळके यांनी सांगितले.

खोंडगेवाडीत सुधीर कदम, अरविंद कदम, संजय दिघे तसेच हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आण्णांचे जोरदार स्वागत करून मिरवणूक काढली.

सिद्धार्थनगर येथील मातंग समाज तसेच गावठाण येथील रोहिदास तरुण मंडळ व संत रोहिदास महिला मंडळाने शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. रोहिदास समाजातील नेत्यांनी सांगितले की, सुनील शेळके हा दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता आहे. त्यांनी आमच्या सभागृहाचे काम आठ महिन्यांच्या आत पूर्ण करून दिले, याचा आम्हाला अभिमान आहे. लोकांची कामे करणारा हा लोकनेता फार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, यात शंका नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.