Talegaon : सुनील शेळके या हिऱ्याची खरी पारख पवार साहेबांनीच केली – गणेश खांडगे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे – कोळशाच्या खाणीत हिऱ्याला किंमत नसते. सुनील शेळके या हिऱ्याची खरी पारख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनीच केली. आता हा हिरा महाराष्ट्राच्या राजकारणात चमकल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी काढले. 

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) वराळे, माळवाडी, कोटेश्वरवाडी, इंदोरी, जांबवडे, सुदवडी व सुदुंबरे या गावांमध्ये प्रचारदौरा काढून मतदारांशी संपर्क साधला. त्यावेळी गणेश खांडगे बोलत होते. दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब भेगडे, विठ्ठलराव शिंदे, अॅड. रुपाली दाभाडे,  माळवाडीचे सरपंच चंद्रकांत दाभाडे, माजी सरपंच बाळासाहेब भोंगाडे आदी नेते तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गणेश खांडगे म्हणाले की, हिरा ओळखण्यासाठी रत्नपारखी लागतो. सुनील शेळके हा हिरा आधी कोळशाच्या खाणीत होता. त्याची त्या ठिकाणी कोणालाही काहीही किंमत नव्हती. शरद पवार साहेबांनी मावळच्या मातीतल्या या हिऱ्याला बरोबर ओळखले. आता हा हिरा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चमकेल.

वराळे येथे भीमाशंकर कॉलनी, शिव कॉलनी, मराठेनगर,भोंगाडे कॉलनी, समता कॉलनी, गुरुदत्तनगर व वराळे गावामधून सुनील  शेळके यांनी पदयात्रा काढली. वराळे गावात सुनील शेळके यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी ‘आमचं ठरलंय’च्या रांगोळ्या काढून मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. घराघरावरून सुनीलआण्णांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. मावळात कायम मागे राहणारे घड्याळ यावेळी सुसाट धावणार असून  वराळे गावची 95%जनता अण्णांच्या पाठीशी राहील, अशा भावना वराळे ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

सुनीलआण्णांनी केलेली विकासकामे व त्यांची लोकप्रियता यामुळे अण्णांना औक्षण करण्यासाठी माळवाडी येथे महिलांनी महामार्गावर अर्धा किलोमीटरची रांग लावली होती. माळवाडीत ज्येष्ठ नेत्या अॅड. रुपालीताई दाभाडे, सरपंच चंद्रकात दाभाडे, माजी सरपंच बाळासाहेब भोंगाडे तसेच गणेश दाभाडे, सुनील भोंगाडे, संपत दाभाडे, गोरखतात्या दाभाडे, सुनील जाधव, अमोल दाभाडे, परेश दाभाडे, रजनी दाभाडे, पूनम माळी, गणेश माळी यांनी त्यांचे स्वागत केले.

कोटेश्वरवाडी येथे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष काशीनाथ दाभाडे तसेच विनायक दाभाडे, सतीश दाभाडे, सचिन दाभाडे, गुलाब दाभाडे, किसन दाभाडे, सुरेश दाभाडे, पोपट दाभाडे, गंगाराम दाभाडे,नितिन दाभाडे, दिपक दाभाडे, श्रीकांत दाभाडे, गुलाब शिंदे, राजू दाभाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

इंदोरीगावातील प्रचारफेरीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग हे वैशिष्ट्य पहायला मिळाले. इंदोरी ग्रामस्थांच्या वतीने क्रेनच्या सहाय्याने हार घालून सुनीलआण्णांचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागताला सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. इंदोरी येथे मुस्लिम बांधवांनी सुनील शेळके यांच्यावर पुष्पवर्षाव केला. इंदोरीत पंचायत समितीचे माजी सभापती विठठ्लराव शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दिलीप ढोरे, उपसरपंच दिनेश चव्हाण तसेच विष्णू खांदवे, प्रशांत भागवत, जयंत राऊत, संजय चव्हाण, बाबा काशिद, विक्रम पवार, बाळकृष्ण पानसरे, अध्यक्ष अब्दुल मुलाणी, संदीप मराठे, प्रवीण राऊत आदींनी सुनीलआण्णांचे स्वागत केले.

जांबवडे येथे सरपंच अनिल घोजगे, राजाराम सुपेकर, सोपान भांगरे, योगेश नाटक, सागर शिंदे, अशोक भंगारे, प्रशांत भोसले, सचिन इंगळे, पप्पू नाटक, संतोष घोजगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

सुदवडीत उपसरपंच रमेश कराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम कराळे, माजी सरपंच गोरक्ष गाडे, दत्तोबा कराळे, पोलीस पाटील वसंत कराळे, सारिका वाळुंजकर, शीतल ताटे, संगीता खेडेकर आदींनी सुनीलआण्णांचे स्वागत केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.