Talegaon : सुनील शेळके यांना रामोशी समाजाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रामोशी समाज बांधवांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांना पाठिंबा दिला.

मावळ तालुक्यातील रामोशी समाजाच्या वतीने शेळके यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते किशोर भेगडे हे देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच रामोशी समाजाच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहिला आहे. समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच आहेत. भाजप सरकारच्या काळात सुटतील, असे वाटले होते, पण रामोशी समाजाला भाजप सरकारने दुर्लक्षित केले, असा आरोप यावेळी करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यातील सर्व रामोशी समाज सुनीलआण्णा यांना विक्रमी मतांनी निवडून देतील, असे यांनी सांगितले. यावेळी पाठिंब्याचे पत्रक देताना प्रदीप म्हसुडगे, नथू वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, विनायक वाघमारे, खंडू चव्हाण, मयूर चव्हाण, संतोष चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,पोपट चव्हाण, नितीन शेळके, गोरख चव्हाण, राहुल शेळके, उमाताई शेळके, अनिकेत माकर तसेच रामोशी समाजातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.