Maval : आई-वडिलांना साक्ष ठेवून सुनील शेळके यांनी घेतली आमदारकीची शपथ

शेळके यांचे होतेय सर्वत्र कौतूक

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आज प्रथमच शपथ घेतली. पण, शेळके यांनी शपथ वेगळ्या पद्धतीने घेतली. शेळके यांनी ईश्वर साक्ष शपथ न घेता आई-वडिलांची साक्ष ठेऊन आमदारकीची शपथ घेतली. त्यांची आई-वडिलांवर अफाट श्रद्धा आहे. विधानसभेत देखील त्यांनी श्रद्धा प्रकट केली. आई-वडिलांना साक्ष ठेऊन शपथ घेतल्याने शेळके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यातील आमदारांचा आज (बुधवारी) शपथविधी पार पडला. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आमदारांना शपथ दिली. मागील 25 वर्षांपासून अबाधित असलेल्या भाजपचा बालेकिल्ला भेदून राष्ट्रवादीकडून निवडून आलेले सुनील शेळके यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली.

सकाळी 11 वाजून नऊ मिनिटांनी सुनील शेळके यांनी शपथ घेण्यास सुरुवात केली. पण, शेळके यांनी वेगळ्या पद्धतीने शपथ घेतली.  त्यांनी शपथेला सुरवात केली की, मी सुनील शंकरराव शेळके विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ‘मी आई-वडिलांची साक्ष शपथ घेतो’….या वाक्यानंतर विधानसभेतील सदस्य त्यांच्याकडे बघत राहिले. इतर आमदार साधारणपणे ईश्वर साक्ष शपथ घेतात. मात्र, शेळके यांनी आई-वडिलांची साक्ष शपथ घेतल्याने त्यांची आई-वडिलांवरील श्रद्धा दिसून आली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, मावळ विधानसभा मतदारसंघातून मागील 25 वर्षांपासून भाजपचा आमदार निवडून येत होता. काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळत नव्हते. यावेळी शेळके यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला. तब्बल 25 वर्षानंतर मावळचा राष्ट्रवादीचा आमदार म्हणून सुनील शेळके यांनी शपथ घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like