Talegaon : सुनील शेळके यांनी गावभेट दौऱ्यात घेतले तुकोबारायांचे आशीर्वाद!

देहूगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार - शेळके

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन भाजपचे युवा नेते व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी गाव भेट दौऱ्यात देहूगावातील नागरिकांशी संवाद झाला. देहूगावाबरोबरच किन्हई, चिंचोली, झेंडेमळा तसेच सुदुंबरे, जांबवडे या गावांमध्येही शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

देहूगावात देऊळवाड्यात जाऊन शेळके यांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर ढोल-ताशांच्या दणदणाटात मिरवणूक काढत ग्रामस्थांनी शेळके यांचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले. गावातील ज्येष्ठांच्या घरी जाऊन शेळके यांनी त्यांचेही आशीर्वाद घेतले. सुंदुबरे गावात संत तुकाराम महाराजांचे टाळकरी संताजी महाराज जगनाडे यांच्या मंदिरात जाऊन शेळके यांनी दर्शन घेतले.
देहूगाव हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून देहूगावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनाकडूनही जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. राज्यभरातून येणारे वारकरी आणि देश-विदेशातून येणारे पर्यटक यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. संतांच्या या पवित्र भूमीचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येईल, असे शेळके यांनी यावेळी सांगितले.
देहूगावच्या दौऱ्यात सरपंच पूनम काळोखे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, विश्वस्त विशाल मोरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर काळोखे, भोलानाथ काळोखे, माजी सरपंच कृष्णा परंडवाल,  देविदास हगवणे, हभप संतोष महाराज काळोखे, जालिंदर महाराज काळोखे, निवृत्ती मारुती पिंजण, अरुण भुंडे, राम भुंडे, बाळासाहेब पिंजण, पंडितराव जाधव,  विशाल काळोखे, प्रवीण झेंडे, सोमनाथ मुसुडगे, माजी सरपंच हेमलता मोरे, नाथामामा गाडे, बाळासाहेब गाडे, माणिकराव गाडे, बापूसाहेब बोरकर, माजी सभापती मंगलताई वाळुंजकर, पोलीस पाटील जगन्नाथ नाटक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.