Maval : मावळात दूध प्रक्रिया उद्योग सुरू करणार – सुनील शेळके

कडधे व बेडसे ग्रामस्थांनी काढली बैलगाडीतून मिरवणूक 

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मावळात दूध प्रक्रिया उद्योग चालू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची घोषणा भाजपचे युवा नेते व तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी आज केली. मावळ तालुक्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले असून त्यातून तालुक्यात पर्यटन विकासावरही भर देण्यात येईल, असे ते म्हणाले.

गाव भेट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी शेळके यांनी पवन मावळात राऊतवाडी येथून सुरूवात केली. लोखंडेवाडी, बेडसे, करुंज, कडधे, येळसे, शेवती, प्रभाची वाडी, सावंतवाडी, महागाव व पवनानगर या गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी बेडसे व कडधेच्या ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून जल्लोषात शेळके यांचे स्वागत केले. त्यावेळी शेळके बोलत होते.

शेळके म्हणाले की, मावळातील बहुतांश शेतकरी हे शेतीबरोबर दुधाचा जोडधंदा करतात. केवळ दूध विक्री करण्याऐवजी दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे प्रक्रिया उद्योग निर्माण केल्यास त्यातून शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळू शकेल. दूध शहरांमध्ये पाठविण्याऐवजी मावळातच दूध प्रक्रिया उद्योग उभारणे ही काळाची गरज आहे. त्यातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला गती मिळू शकेल.

गाव भेट दौऱ्यात आज सरपंच सदाशिव शेंडगे तसेच विठोबा शेंडगे, रामदास राऊत, दीपक राऊत, बबन लोखंडे, काळू बरदाडे, बबन तुपे, संजय खराडे, भारत गरदाळे, ग्रामपंचायत सदस्य काळूराम तुपे, पंढरीनाथ दहिभाते, विठोबा दहिभाते,  नितीन वाघमारे, भाऊसाहेब ठाकर, सरपंच शिवाजी सुतार, उपसरपंच नवनाथ ठाकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.