Talegaon : सुनील शेळके यांच्या झंझावाती प्रचारदौऱ्याने पवन मावळ ‘आण्णामय’!

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस- एसआरपी व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांच्या झंझावाती प्रचारदौऱ्याने आज (सोमवारी) पवन मावळ अक्षरशः ‘आण्णामय’ होऊन गेला. सुनीलआण्णांचे उत्स्फूर्त स्वागत होण्याबरोबरच त्यांना अधिकाधिक मताधिक्य मताधिक्य मिळवून देण्यासाठी गावा-गावांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेळके यांच्या प्रचारदौऱ्याला सोमाटणे येथून सुरूवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष
बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादूबुवा कालेकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्ष सुवर्णा राऊत, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके आदी नेते त्यांच्या बरोबर होते. सोमाटणे, परंदवडी, धामणे, उर्से, ओझर्डे, सडवली, बौर, बेडसे, करूंज गावांमध्ये, सुनिल शेळके यांचे फटाके  ढोल ताशे गजरात स्वागत करण्यात आले जागोजागी सुनील शेळके यांच्यावर पुष्प वर्षाव करण्यात प्रत्येक गावामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात औक्षण करण्यात आले. काही गावांमध्ये तर औक्षणासाठी महिलांची लांबच लांब रांग लागल्याचे पहायला मिळत होते.

_MPC_DIR_MPU_II

बैलगाडीतून तर काही ठिकाणी घोड्यावर बसवून तर एका गावात चक्क बुलेट मोटारसायकलवर बसवून शेळके यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्व गावांतील ग्रामस्थांनी सुनीलआण्णांना त्यांच्या गावातून जास्तीजास्त मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे मताधिक्य मिळवून देण्यासाठी गावा-गावांमध्ये चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत होते.

सुनील शेळके यांच्या मध्यस्थीने कडधे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. त्या गावात तर सुनीलआण्णांचे फारच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

सोमटणे येथे विष्णू मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, राकेश मुऱ्हे , नितीन मुऱ्हे, संदीप मुऱ्हे, प्रशांत मुऱ्हे, रामभाऊ मुऱ्हे , शरद मुऱ्हे, शाबु मुऱ्हे, नरेंद्र मुऱ्हे, विकास मुऱ्हे, मयूर मुऱ्हे, हसन शेख, गोकुळ गायकवाड, भरत मुऱ्हे, दत्तात्रय मुऱ्हे, प्रवीण मुऱ्हे, परंदवडी येथे सरपंच सिंधुताई भोते, वसंत भोते, भरत भोते, अजित भोते, रमेश भोते, धामणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार गराडे तसेच अनिल गराडे, संदीप गराडे, बाळू गराडे, तुकाराम गराडे, भीम गराडे, काळूराम गराडे, उर्से येथे सरपंच अमर शिंदे, उपसरपंच अविनाश कारके बाजार समितीचे सभापती गुलाब धामणकर, माजी उपसरपंच
भरत कारके तसेच जालिंदर बराटे, सुलतान मुलाणी, राजाराम सावंत, ओझर्डे येथे शिवाजी पडवळ, सोमनाथ भेगडे, रामदास ओझरकर, दत्तात्रय ओझरकर , भास्कर पाबळ, बेडसे येथे माजी सरपंच चंद्रकांत दहीभाते, पंढरीनाथ दहीभाते तसेच दत्तात्रय दहीभाते, बबन दहीभाते, गणपत पवार, राऊतवाडी येथे पोपट राऊत, आदेश लगड, नवनाथ लगड, बबन वाघमारे, संतोष जाधव तर करुंज येथे सरपंच सदाशिव शेंडगे तसेच वैभव
शेंडगे, मदन वाळुंज, संतोष लगड, शंभू वाळुंज आदींनी सुनीलआण्णांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.