Lonavala : सुनील शेळके यांच्या पदयात्रेने ढवळून निघाला लोणावळा परिसर

एमपीसी न्यूज – ढोल-ताशांचा दणदणाट, रांगोळ्यांच्या पायघड्या, घरोघर प्रेमाने होणारे स्वागत, दिवसेंदिवस वाढत चाललेला पाठिंबा, शेकडो कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात पदयात्रा काढून मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी आज लोणावळा शहर व परिसर अक्षरशः ढवळून काढला. 

लोणावळा शहरात सुनील शेळके यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. गवळीवाडा येथील राम मंदिरात दर्शन घेऊन शेळके यांनी प्रचारफेरीची सुरुवात केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बढेकर, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव नारायण आंबेकर तसेच दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्ष मंजुश्री वाघ तसेच यशवंत पायगुडे, नितीन शहा, किरण गायकवाड,  अशोक मावकर, भरत हरपुडे, अरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुजाता जाधव, पुष्पा भोकसे, सुवर्णा अकोलकर, श्वेता वर्तक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण लोणावळा शहरात सुनीलआण्णा यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

तुंगार्ली येथे ढोल- ताशे, बेन्जोच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांनी सुनील शेळके यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात अशोक मावकर, मंगेश मावकर, सुनील बंडा अंभुरे, बाजीराव मावकर, आकाश कुटे, एकनाथ मावकर, नामदेव अंभुरे, सुरेश खिल्लरे तसेच शिवदुर्ग रेस्कू टीम, गणेश मित्र मंडळ, गार्डन बॉइज, विघ्नहर्ता मित्र मंडळ, गणराज मित्रमंडळ, हिंदुत्व अष्टविनायक मित्र मंडळ, साई सेवा बचत गट, कुलस्वामीनी महिला मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ही निवडणूक सुनील शेळकेंची राहिलीच नाही ही निवडणूक आता जनतेनेच हातात घेतली आहे, असे मत लोणावळ्याचे माजी नगरसेवक अशोक मावकर यांनी व्यक्त केले.

पांगोळी येथील ग्रामस्थांनी शेळके यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढल्या होत्या. आण्णा, तुम्ही जनतेची इतकी कामे केली आहेत की तुम्ही केव्हाच मावळच्या जनतेच्या मनातले आमदार झाला आहात’, अशा भावना पांगोळीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. बापूलाल तारे, दत्ता मालपोटे, किरण शेटे, हरीलाल अंभुरे, सचिन बोके, अनिकेत जाणीरे,नंदू कांबळे, अनिल कोंढभर, सूरज खांडेभरड आदींनी शेळके यांचे स्वागत केले.

सुनील शेळके म्हणाले की, आतापर्यंत आपण येथील मंदिराची समस्या आणि स्मशानभूमीची समस्या मांडली असती तर तुम्हाला या दोन्ही गोष्टींची पूर्तता झाली असती. विकासासाठी तुम्ही एक पाऊल पुढे या, तुमच्यासाठी मी दहा पाऊले पुढे येण्यास सदैव तयार आहे.

वलवण येथे पदयात्रेत माजी नगराध्यक्ष श्यामराव पाळेकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर तसेच माधव पाळेकर, कमुशेठ जगधनवाला, उमेश तारे, सनी पाळेकर, शेखर खिल्लारे, विद्या तारे, हर्षल क्षीरसागर, अमोल गायकवाड, उल्लास पाळेकर, किशोर गायकवाड, अनिल पानसरे, सचिन तारे, मनीष पाळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.