Sunny Leone: ‘सनी लियोन’चे नाव कॉलेज मेरिट लिस्टमध्ये, म्हणाली तुम्ही सगळे माझ्या वर्गात असाल अशी आशा करते

Sunny Leone on topping the merit list of a Kolkata college: See you all in college next semester अभिनेत्री सनी लियोन हिला ही बातमी समजताच तिने यावर गमतीशीर पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.

एमपीसी न्यूज – कोलकत्ता येथील एका महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनचे नाव आले आहे. सनी लियोने यावर गमतीशीर प्रतिक्रिया देत, आपण पुढच्या सत्रात भेटू, आशा आहे तुम्ही सगळे माझ्या वर्गात असाल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे देशात कोरोना महामारीचं थैमान सुरू आहे आणि विविध परिक्षा घेण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मात्र कोलकत्यातील एका महाविद्यालयात गंमतीशीर प्रकार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोन हिचे नाव झळकले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री सनी लियोन हिला ही बातमी समजताच तिने यावर गमतीशीर पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, आपण पुढच्या सत्रात भेटू, आशा आहे तुम्ही सगळे माझ्या वर्गात असाल असे सनी म्हणाली.

दरम्यान, सनी लियोन या अभिनेत्रींचे नाव नजर चुकीने गुणवत्ता यादीत आल्याचे महाविद्यालयाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.