Supe : सुपे गावातून पावणेचार लाखांचा गांजा जप्त, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सुपे गावातून सुमारे पावणे ( Supe ) चार लाखांचा 15 किलो 450 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.25) अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

विकास रोहीदास बदाले (वय 27 तळेगाव एमाआयडीसी), शिवाजी वसंत भोसले (वय 36 करंजविहीरे), लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय 37 अंबोली) यांना अटक केली असून विशाखापट्टणम येथील एक इसम पूर्ण पत्ता व नाव माहिती नाही. याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे  यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली की तीन इसम हे गावातील मुक्ताई मंदिरा समोर गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ही ताब्यात घेतले.

Maharashtra News : पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहा – मुख्यमंत्री

यावेळी विकास व शिवाजी यांच्या ताब्यात 2 लाख 52 हजार 150 रुपयांचा  10 किलो 86 ग्रॅम वजनाचा गांजा तर लक्ष्मण याच्याकडून 1 लाख 34 हजार रुपयांचा 5 किलो 364 ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण 3 लाख  86 हजार 250 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

लक्ष्मण याने त्याच्याजवळील गांजा हा विकास व शिवाजी यांच्याकडून विकत घेतला होता .तर विकास व शिवाजी याने विशाखापट्टणम येथील चौथ्या साथीदाराक़डून विकत घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिनही आरोपींकडून एकूण 4 लाख 1 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींवर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Supe ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.