Pune : नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करा, अन्यथा आंदोलन ; राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिपाली धुमाळ यांचा इशारा

एमपीसी न्यूज – यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुणे शहराला होणारा पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीसुद्धा वारजे परिसरातील काही भागातील नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी बैठ्या घरांना सुद्धा अतिशय कमी वेळ व कमी दाबाने पाणी मिळत आहे. या नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा झाला नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी आज दिला.

_MPC_DIR_MPU_II

एखाद्या गुरुवारी पाणी बंद असेल तर पुढील किमान दोन ते तीन दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्याचप्रमाणे काही सोसायटी भागात सुद्धा कमी वेळ व कमी दाबाने तसेच अनियमित पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी सूचना अथवा तक्रारी संबंधित प्रशासनाला केल्या, तर त्या तक्रारीचे निरसन होत नाही. पाणीपुरवठा प्लॅटवरील जे वाॅलमन आहेत, त्या कामगारांचे पगार सुद्धा तिन तिन चार चार महिने होत नाही, या गंभीर तक्रारीकडे त्वरीत लक्ष घालून वरील प्रश्न सोडविले नाहीत, तर आम्हाला नाईलाजास्तव नागरिकांना घेऊन संबंधित प्रशासना विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दीपाली धुमाळ यांनी दिला आहे.

आताच किमान आवश्यक असणार पाणी जर मिळत नसेल तर चोवीस तास पाणी कसे देणार, असाही प्रश्न नागरिक विचारित आहेत. तरी आठ दिवसांत पाणीपुरवठा व्यवस्थित व जादा दाबाने झाला नाही, तर प्रशासनाविरोधात आंदोलन करावे लागेल, असेही धुमाळ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.