Pune : हडपसरच्या विकासासाठी मनसेला साथ द्या – वसंत मोरे

एमपीसी न्यूज – टीकाटिप्पणी करण्यापेक्षा मी कायमच विकासाचे राजकारण केले आहे. हडपसरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मनसेला साथ द्या, असे आवाहन हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी केले.

महंमदवाडी, सय्यदनगर, चिंतामणी नगर, तरवडे वस्ती भागांत वसंत मोरे यांची आज भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. महिलांनी घरोघरी मोरे यांचे औक्षण केले. या भागांतील समस्या सोडविण्यासाठी मनसेच पुढाकार घेऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला. हलगीचा नादाने प्रचारात रंगत आणली होती. या रॅलीत तरुण, महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगरसेवक साईनाथ बाबर, निखिल दाभाडे, अजहर सय्यद, अक्षय संकपाळ, सुहास पडवळ, अजिंक्य ससाणे, हर्षल बाबर, शेखर लोणकर, सतीश शिंदे, अमोल शिरस यावेळी उपस्थित होते.

मनसेचे ध्वज उंचावत यावेळी घोषणा देण्यात आल्या. कोंढवा भागात मनसेने पुणे महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. त्याचा जोरावर वसंत मोरे यांना भरघोस मते मिळवून देणार असल्याचे अश्वासन नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिले. तर, हडपसर परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर आहे. त्यासाठी आपण वारंवार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविला. नागरिकांना चांगल्या दाबाने पाणीपुरवठा व्हावा. उत्कृष्ट रस्ते व्हावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.