Support MPC News: आपण असा करू शकता ‘एमपीसी न्यूज’ला ‘सपोर्ट’!

This is how you can support MPC News!

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल असणाऱ्या ‘एमपीसी न्यूज’ने नुकतीच बारा वर्षांची वाटचाल पूर्ण करून 13 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पत्रकारांनी सुरू केलेल्या व चिकाटीने चालविलेल्या या मीडिया हाऊस तपपूर्ती केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे एमपीसी न्यूजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशा परीक्षेच्या काळात आम्हालाही आपल्या पाठबळाची नीतांत गरज आहे. नेहमीप्रमाणे या संकट काळातही समाज आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

कोरोना संकट आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक सर्वच मीडिया हाऊसचे अर्थकारण ढासळले आहे. कोरोनाने अनेक पत्रकारांच्या नोकरीचा पण बळी घेतला आहे. अनेक माध्यम संस्थांनी त्यांच्या पत्रकारांचे वेतन निम्म्यापर्यंत कमी केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’ने मात्र कोणत्याही परिस्थितीत टीम मेंबरचे वेतन कमी न करण्याचा निर्णय घेतला.

करा दिवसाला फक्त एक रुपयाचा सपोर्ट!

आपली सेवा यापुढेही अशीच चालू राहण्यासाठी तसेच अधिक सक्षमपणे सेवा देण्यासाठी ‘एमपीसी न्यूज’च्या टीमचा विस्तार करण्याची योजना आहे. त्यासाठी आम्हाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. अर्थातच त्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती असणार नाही. आपण दिवसाला एक रुपया याप्रमाणे एक वर्षासाठी किमान 365 रुपये इतकी ऐच्छिक वर्गणी एमपीसी न्यूजच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करावी, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करीत आहोत.

सपोर्ट पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाचा!

आम्ही गेल्या 12 वर्षांत प्रामाणिकपणे केलेल्या सेवेची दखल घेऊन तसेच यापुढे अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी #i_support_mpcnews या मोहिमेत सहभागी व्हाल, असा विश्वास वाटतो.

वर्षाला 365 रुपये शक्य नसेल तर एक रुपयापासून कितीही ऐच्छिक रक्कम आपण आमच्या कामासाठी मदत म्हणून पाठवू शकता. आपला एक रुपया देखील आमच्यासाठी मोलाचा आहे. तो सत्कारणीच लागेल, याची खात्री आम्ही आपणास देतो.

वर्षाला 365 रुपयांपेक्षा अधिक सपोर्ट करण्याची इच्छा असणारे वाचक व हितचिंतक त्यांच्या इच्छेप्रमाणे अधिकची मदत देखील करू शकतात. आपणही मदतीचा हात पुढे करावा आणि आपल्या मित्रांनाही त्याबाबत सांगावे, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करीत आहोत.

आपण सपोर्टची रक्कम अशी पाठवू शकता…

  • स्टेप – 1

mpcnews.in वर जाऊन कोणत्याही बातमीवर क्लिक करून बातमी ओपन करावी.

  • स्टेप – 2

प्रत्येक बातमीच्या खाली एमपीसी न्यूजचा लोगो असलेली ‘सपोर्ट आवर जर्नालिझम, सपोर्ट एमपीसी न्यूज’ असे लिहिलेली एक इमेज दिसेल. या इमेजमध्ये ‘डोनेट’ असे लिहिलेले एक बटन दिसेल. त्या बटणावर क्लिक करा. तिथे एक छोटासा फॉर्म ओपन होईल.

  • स्टेप – 3

त्या फॉर्ममध्ये केवळ आपला ई-मेल आयडी, मोबाईल फोन नंबर आणि आपण सपोर्ट म्हणून देऊ इच्छिता त्या रकमेचा आकडा एवढीच माहिती भरून त्या खाली ‘Donate’ असे लिहिलेल्या बटणावर क्लिक करावे.

  • स्टेप – 4

त्यानंतर UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यापैकी कोणताही एक पर्याय निवडून आपण ऑनलाईन रक्कम पाठवू शकता.

आपण दिलेल्या ई-मेल आयडीवर आपण सपोर्ट म्हणून पाठविलेल्या रक्कमेची अधिकृत पावती काही सेकंंदात आपणास प्राप्त होईल.

अधिक माहिती साठी पाहा खालील व्हिडीओ

रोख रक्कम

एमपीसी न्यूजच्या कार्यालयात जाऊन अथवा एमपीसी न्यूज प्रतिनिधीकडे रोख रक्कम जमा करून त्याची रितसर पावती घ्यावी.

कार्यालयाचा पत्ता –

एमपीसी न्यूज प्रा. लि.

31, भक्ती कॉम्प्लेक्स, तळमजला

डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे, हॉटेल अल्पाईन शेजारी

पुणे-मुंबई महामार्गालगत, खराळवाडी, पिंपरी, पुणे – 411018

संपर्क क्रमांक – 9011050005

आपण आतापर्यंत केलात त्यापेक्षा अधिक सपोर्ट आता आणि भविष्य काळात कराल आणि प्रामाणिक, सकारात्मक पत्रकारितेला सामाजिक व आर्थिक पाठबळ देखील द्याल, असा मनोमन विश्वास वाटतो. धन्यवाद!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.