Pune : दिवाळीत 2 तासच वाजवता येणार फटाके; सर्वोच्‍च न्यायालयाचा निर्णय 

एमपीसी न्यूज – सर्वोच्‍च न्यायालयाने  आज, मंगळवारी फटाक्यांबाबत महत्त्‍वपूर्ण निकाल दिला आहे. फटाक्यांवर बंदीची याचिका फेटाळताना न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. तसेच फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवर मात्र न्यायालयाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 
_MPC_DIR_MPU_II
न्यायालयाने दिवाळीत फटाक्यांवर सरसकट बंदीची मागणी फेटाळली. पर्यावरणपुरक फटाके वाजवण्यास परवानगी देताना न्यायालयाने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडता येतील.
दिवाळीत फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्‍च न्यायालयात फटाक्यांची निर्मिती व विक्रीस बंदी घालण्याची याचिका करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती ए.के. सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने 28 ऑगस्‍ट रोजी झालेल्या सुनावणीत निकाल राखून ठेवला होता. त्यावर मंगळवारी निकाल दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.