Supreme Court About Migrant Workers: 15 दिवसांच्या आत स्थलांतरित मजुरांना घरी पाठवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court has ordered that migrant workers are to be transported back to their home towns within 15 days राज्यांकडून श्रमिक रेल्वेची मागणी आल्यानंतर केंद्र सरकारने 24 तासांच्या आत अतिरिक्त रेल्वे दिल्या पाहिजेत

एमपीसी न्यूज- आपल्या घरी जाण्यास इच्छुक असलेल्या स्थलांतरित मजुरांना 15 दिवसांच्या आत पाठवले जाणार आहे. मंगळवारी (दि.9) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना याबाबत निर्देश दिले आहेत. सर्व प्रवाशांना आजपासून 15 दिवसांच्या आत पाठवण्यात यावे. प्रवाशांची नोंदणीच्या माध्यमातून ओळख पटवण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठ ओळख, नोंदणी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दिशा-निर्देश देत आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रवाशांना रोजगार देण्यासाठी योजना सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले की, राज्यांकडून श्रमिक रेल्वेची मागणी आल्यानंतर केंद्र सरकारने 24 तासांच्या आत अतिरिक्त रेल्वे दिल्या पाहिजेत. स्थलांतरित मजुरांच्या ओळखीसाठी एक यादी तयार केली जावी. त्यांना रोजगार सहायताशी जोडले जावे. त्यांच्या कौशल्याचीही नोंदणी झाली पाहिजे.

आपात्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्रवाशांविरोधात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश देत न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.