Maharashtra : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटले हा सरकारचा कमीपणा नाही का? – अजित पवार

एमपीसी न्यूज – काल सुप्रीम कोर्टाने या शिंदे-फडणवीस सरकारला (Maharashtra) नपुंसक सरकार म्हटले आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का, हा सरकारचा कमीपणा नाही का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

केरळमधील एका पत्रकाराने महाराष्ट्रात काही सभांमधून हिंदू संघटनांकडून करण्यात येत असलेल्या द्वेषपूर्ण भाषणांवर महाराष्ट्र पोलीस कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने  हे सगळं घडतंय कारण राज्य सरकार नपुंसक आहे, असमर्थ आहे, वेळेत कारवाई करत नाही, अशी परखड टिप्पणी केली होती. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Maval : माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी घेतली शिवभक्तांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

नाशिकमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार  म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवल्यानंतर सगळ्यांनी त्या गोष्टीचा आदर करुन सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे. (Maharashtra) 1960 पासून आत्ता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत कधीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या कोणत्या सरकारला नपुंसक म्हटल्याचे ऐकलं का? जर सर्वोच्च न्यायव्यवस्थाच तसं म्हाणायला लागली तर खरच सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाने सर्वच राज्याच्या बाबतीत ही टिप्पणी केली असून विरोधकांना कोर्टाचे कामकाज समजत नसल्याचे प्रतिउत्तर दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.