Supriya Sule Birthday: तळेगाव नगरपरिषदेच्या 40 महिला सफाई कामगारांचा सन्मान

एमपीसी न्यूज – खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘सावली’ या उपक्रमाअंतर्गत आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेमधील  40 महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान करून  एक रोप, मास्क, सॅनिटीझर, आर्सेनिक अल्बम 30 च्या रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गोळ्या व पावसाळ्यासाठी रेनकोट या गोष्टींचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून सावली हा उपक्रम, राज्यभरातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाना आधार देणारी व्यक्ती ‘सावली’ असते, त्याच स्वरूपात राज्यातील महिलांच्या बाबतीत नेहमीच सावलीचे काम  खासदार सुप्रिया सुळे या करत आहेत.  त्यामुळे या उपक्रमाला सावली नाव देण्यात आले.

कार्यक्रमास उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक रोहित लांघे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा ज्योती शिंदे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा निशा पवार या उपस्थित होते.

 वृक्षाच्या सावलीचे महत्व एखाद्या वाटसरूलाच समजते तसेच तुम्ही आम्ही सर्वजण एक वाटसरुच आहोत आणि आपल्या महिलांच्या वाटेवर  खासदार सुप्रिया सुळे नावाचे वृक्ष असल्याने आपल्याला नेहमीच हक्काची सावली भेटत असते, असे वैशाली दाभाडे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.