Pune : ऑफर द्यायला मी काही साबण नाही- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांची पंतप्रधानांवर टीका

एमपीसी न्यूज- सत्ताधारी भाजपकडे काही राहिले नसल्याने त्यांच्याकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मला पंतप्रधानांकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. ऑफर द्यायला मी काही साबण नाही अशा शब्दात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवार यांच्याविषयी सतत विधाने बदलत असून पंतप्रधानकडून तुम्हाला देखील ऑफर असल्याचे चर्चा सुरू होती ? या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

पार्थ पवार हे देखील निवडणुकीत असल्याने त्यांच्या प्रचाराला जाणार का या प्रश्नावर पार्थसाठी मावळमध्ये जाऊन प्रचार आणि सभा देखील घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सागितले. तसेच या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना प्रचार करताना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सत्ताधारी भाजप विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. यामुळे राज्यात आघाडीच्या मागील निवडणुकी पेक्षा सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like