Supriya Sule : महागाई कमी करा अन्यथा महिलांच्या क्रोधाला सामोरे जा..

एमपीसी न्यूज : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून (Supriya Sule) भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारवर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती महागाई रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत नाहीतर देशभरातील महिलांच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल असे आवाहन केले. 

“मी खासदार आहे, पण त्याआधी मी एक स्त्री आणि गृहिणी आहे. देशासमोर महागाईचे मोठे आव्हान असून, केंद्र सरकार त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही केंद्र सरकारला महागाई आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी करत आहोत, परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युनिटने आयोजित केलेल्या आंदोलनात सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले.

Hinjawadi Crime News : गॅस चोरी प्रकरणी हिंजवडी पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

एलपीजी सिलिंडरबद्दल सांगताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, की “गरीब महिलांना एलपीजी सिलिंडर देताना पंतप्रधानांचे होर्डिंग्ज आहेत. परंतु, सरकारच्या नोंदीनुसार सुमारे एक कोटी लाभार्थींनी सिलिंडर रिफिल केलेले नाहीत. आम्ही पंतप्रधानांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या आवाहनानुसार गरिबांना सबसिडी मिळावी म्हणून एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी सोडली. मात्र, त्यांना अनुदानही मिळत नाही. पैसे गेले कुठे गेले?” असा सवाल सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शहरभर निदर्शने करून सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. आम्हाला तुमच्यावर (पंतप्रधान) राग नाही, पण महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकार असंवेदनशील कसे झाले आहे? याचे आश्चर्य वाटते. देशातील सर्व महिलांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे की, त्यांनी सर्व राज्यांच्या सरकारांना विश्वासात घेऊन महागाई कमी करण्यासाठी काम करावे. महिलांना राग आला, तर ते केंद्र सरकार अस्थिर करतील, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.