Supriya Sule :  महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे सेलिब्रेशन?

एमपीसी न्यूज – उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. फेसबुकवर लाईव्ह करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता पसरली. परंतु असं असताना अवघ्या काही वेळातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे सेलिब्रेशन करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ठाकरे सरकार कोसळले असताना अचानक सुप्रिया सुळे यांचे सेलिब्रेशनचे व्हायरल झालेले फोटो पाहून चर्चांना उधाण आलं होतं. परंतु काही क्षणातच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबियांनी घरातच वाढदिवस साजरा केला. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केक कापून आनंद साजरा केला. यावेळी त्यांचे पती सदानंद सुळे आणि दोन्ही मुलेही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी मोठी घडामोडी झाली असतानाही सुप्रिया सुळे यांनी केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला आणि त्यांच्या या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांच्या या वाढदिवसाची चर्चा रंगली.

GST Rate : पुन्हा खिशाला कात्री! 18 जुलै पासून पाकीटबंद (फ्रोजन) पदार्थांवर लागू होणार जीएसटी दर

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मागील दहा दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरू होता. या संघर्षात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.