Surat & Udaygiri : भारतीय नौदलाची ताकद वाढली; दोन युद्धनौकांचा समावेश

एमपीसी न्यूज : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढवण्यासाठी दोन स्वदेशी युद्धनौकांचा (Surat & Udaygiri) समावेश करण्यात आला आहे. आयएनएस सुरत आणि उदयगिरी या दोन्ही युद्धनौकांची रचना नौदलाच्या नेव्हल डिझाईन डायरेक्टोरेटने केली आहे. दोन्ही युद्धनौकांची नावे शहर आणि पर्वताच्या नावावर आहेत. INS सुरत गुजरातच्या सुरत शहरातून तर INS उदयगिरी हे उदयगिरी पर्वतावरून घेतले आहे.

INS सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B चे पुढील पिढीतील स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. तर, आयएनएस उदयगिरी ही आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली युद्धनौका आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते माझगाव डॉक येथे त्याचे उद्घाटन करण्यात आले. दोन्ही युद्धनौका आधुनिक विध्वंसक शस्त्रे आणि सुविधांनी सुसज्ज आहेत. भारतीय नौदलात या दोन युद्धनौका सामील झाल्यामुळे नौदलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. या दोन्ही युद्धनौकांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

आयएनएस सुरत : Surat & Udaygiri 

INS सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B चे पुढील पिढीतील स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. प्रोजेक्ट 15B ची पहिली युद्धनौका IS विशाखापट्टणम गेल्या वर्षी भारतीय नौदलात सामील झाली होती. तर, उर्वरित दोन युद्धनौका आयएनएस मुरगाव आणि आयएनएस इंफाळच्या चाचण्या सुरू आहेत. गुजरातची व्यापारी राजधानी असलेल्या सुरत शहराच्या नावावरून त्याचे नाव INS सुरत असे आहे. ही एक फ्रंटलाइन युद्धनौका आहे, जी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होती. युद्धनौके 15A म्हणजेच कोलकाता श्रेणीतील विनाशक युद्धनौकेच्या तुलनेत हा एक मोठा बदल आहे. हे ब्लॉक बांधकाम पद्धतीने केले जाते.

आयएनएस उदयगिरी : Surat & Udaygiri 

स्वदेशी बनावटीची INS उदयगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A ची तिसरी फ्रिगेट युद्धनौका आहे. ही युद्धनौका आधुनिक सुविधा आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. या युद्धनौकेला सेन्सर्स, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम आणि आधुनिक शस्त्रे बसवण्यात आली आहेत. नौदलाच्या या प्रकल्पांतर्गत 7 फ्रिगेट्स भारतातच बनवल्या जाणार आहेत. या युद्धनौकेला आंध्र प्रदेशच्या पर्वतराजीवरून आयएनएस उदयगिरी असे नाव देण्यात आले आहे. ही युद्धनौका उदयगिरीच्या पूर्वीच्या आवृत्तीची दुसरी आवृत्ती आहे. ज्याने 18 फेब्रुवारी 1976 ते 24 ऑगस्ट 2007 पर्यंत सलग तीन दशके देशाच्या सागरी सीमेचे रक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.