Pune : सुरेखा भोसले यांना रणरागिणी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त स्वाती मोराळे सखी मंच तर्फे रणरागिणी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते सुरेखा तुकाराम भोसले यांना रणरागिणी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य गोपाळ चौधरी, उद्योजक गणेश मुंडे, सखी मंचच्या संस्थापक अधीक्षक स्वाती मोराळे आदि मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.