Talegaon : नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी सुरेश दाभाडे, रवींद्र आवारे व गणेश काकडे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाचे सुरेश दाभाडे, जनसेवा विकास समितीचे रविंद्र आवारे, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडू गणेश काकडे यांची बिनविरोध निवड झाली.

ही निवडणूक अॅड श्रीराम कुबेर, सुनील कारंडे, आनंद भेगडे यांनी स्वीकृत सदस्य पदाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे घेण्यात आली होती. नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा व सभेच्या पीठासन अधिकारी चित्रा जगनाडे यांच्या अधिपत्याखाली निवडणूक पार पडली. तर मुख्याधिकारी सचिन पवार व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी सहाय्यक म्हणून काम केले. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष अॅड रविंद्र दाभाडे, सुरेश धोत्रे, राजेंद्र जांभूळकर, रवींद्र अप्पा भेगडे, संतोष खांडगे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी,नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वीकृत सदस्य पदाच्या तीन जागाकरिता भारतीय जनता पक्षाने माजी शिक्षण मंडळ सभापती सुरेश दाभाडे यांची शिफारस केली होती.जनसेवा विकास समितीने माजी शिक्षण मंडळ सभापती रविंद्र आवारे यांची तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती कडून माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश काकडे यांची शिफारस केली होती.

या तिघांनी आपले अर्ज जिल्हाअधिकारी यांच्याकडे सादर केले होते. जिल्हाधिकारी यांनी त्यांची छाननी करून ते वैध्  असल्याचे पत्र निवडणूक पीठासन अधिका-यास दिले होते.त्यानुसार निवडणूक पीठासन अधिका-यांनी या तिघांची नियुक्ती बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

नियुक्तीनंतर सर्वांनी बाके वाजवून स्वागत केले. निवडीनंतर सभागृहात अभिनंदनपर सभा घेण्यात आली. यावेळी नगरसेवक बापूसाहेब भेगडे, सभागृहनेते सुशील सैंदाणे, सुनील शेळके, किशोर भेगडे, संतोष दाभाडे पाटील, गणेश खांडगे, संग्राम काकडे, सुरेश दाभाडे, रविन्द्र आवारे, गणेश काकडे, किशोर आवारे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांची भाषणे झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.