Suresh Raina Retirement: धोनी पाठोपाठ सुरेश रैनानेही केली निवृत्तीची घोषणा

सुरेश रैनाने म्हटले आहे की, माही तुझ्याबरोबर खेळण्यासारखी दुसरी प्रेमळ गोष्ट नव्हती. मी मनापासून अभिमानाने, या प्रवासातही तुझ्याबरोबर सहभागी होण्याच्या पर्यायाची निवड करतो.

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू सुरेश रैना याने धोनीला या प्रवासातही साथ देणार असल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकत तोही निवृत्त होत असल्याचे सूचित केले आहे. 

सुरेश रैनाने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माही तुझ्याबरोबर खेळण्यासारखी दुसरी प्रेमळ गोष्ट नव्हती. मी मनापासून अभिमानाने, या प्रवासातही तुझ्याबरोबर सहभागी होण्याच्या पर्यायाची निवड करतो. धन्यवाद भारत. जय हिंद!

भारतीय संघातील मधल्या फळीतील धडाकेबाज डावखुरा फलंदाज म्हणून स्वतःची वेगळी छाप पाडणाऱ्या या दुसऱ्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींनी मोठा धक्का बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.