Bajaj Allianz : चीनला मागे टाकत, बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सने ‘GUINNESS WORLD RECORDS™’मध्ये नोंदवला नवा विक्रम

एमपीसी न्यूज : भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलायन्झ (Bajaj Allianz) लाइफ इन्श्युरन्सने ‘मोस्ट नंबर ऑफ पीपल होल्डिंग द अब्डॉमिनल प्लान्क पोझिशन’ अर्थात एकाचवेळी पोटावर प्लॅन्क स्थितीमध्ये राहिलेल्या लोकांच्या सर्वाधिक संख्येचा विक्रम मोडत नवी इतिहास रचला आहे. आज जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये पार पडलेल्या बजाज अलायन्झ लाइफ प्लॅन्केथॉनमध्ये 4454 लोकांनी एका मिनिटासाठी प्लॅन्क स्थितीमध्ये राहून दाखविले. या आधी या श्रेणीमध्ये चीनने केलेला 3,118 लोकांचा विक्रम मोडून काढत कंपनीने हे यश प्राप्त केले आहे.

या विश्वविक्रमाविषयी बोलताना बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर चंद्रमोहन मेहरा म्हणाले, “चांगले आरोग्य आणि सर्वांगिण स्वास्थ्य साध्य करण्याप्रती आमची बांधिलकी या प्लॅन्केथॉन उपक्रमामध्ये प्रतिबिंबित झाली आहे. #PlankToThank ही मोहीम आपली सैन्यदलांबद्दल – आपल्या खर्याखुर्या वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संकल्पित करण्यात आली आहे व या मोहिमेने भारतभरातून भरभरून प्रतिसाद मिळविला आहे व लोक प्रचंड संख्येने या मोहिमेमध्य सहभागी झाले आहेत. अधिक निरोगी आणि अधिक आनंदी भारतीय हीच भारताच्या जीवनध्येयांचा खरा इन्श्युरन्स आहेत.”

भारतासाठी पहिला ODI विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देव म्हणाले, “फिटनेसला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि एका अनोख्या पद्धतीने या मंचाचा वापर करत आपल्या खरा वीरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल मी बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सचे अभिनंदन करतो. आणखीही अनेक लोक या प्लॅन्क चळवळीशी जोडले जाताना आणि स्वत:साठी, स्वत:च्या प्रियजनांसाठी व भारतासाठी सर्वांगिण स्वास्थ्याचा स्वीकार करताना पाहण्यास मी उत्सुक आहे. ”

प्लॅन्केथॉनच्या सध्याच्या तिसऱ्या पर्वामध्ये केलेला नवा विश्वविक्रम (Bajaj Allianz) हा कंपनीच्या 1 जुलै 2022 रोजी सुरू झालेल्या #PlankToThank उपक्रमाचा एक भाग होता. आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने भारतीय सैन्यदलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना आपले प्लॅन्किंग व्हिडिओ किंवा छायाचित्रे शेअर करण्याचे आवाहन केले होते. निवृत्त सैनिकांमध्ये उद्योजकतेला मदत करण्यासाठी कंपनीने आर्थिक योगदान दिले आहे.  तांत्रिक कौशल्ये पुरविणे, बिझनेससाठी मार्गदर्शन देणे आणि भांडवल उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टींचा समावेश असलेल्या पुन:कुशलन अर्थात रि-स्किलिंग कार्यक्रमाची अंमलबजावणी iCreate India च्या सहयोगाने केली जाईल.

Divyasvatantryavi : ‘दिव्यस्वातंत्र्यरवि : एक दिव्य अनुभूती’

फिटनेसचा पुरस्कार करण्यासाठी कंपनीकडून 2018 सालापासून आगळेवेगळे, लोकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेणारे प्लॅन्क उपक्रम आयोजित केले जात आहेत. यातून या कार्याशी निगडित पार्टनर्सच्या साथीने सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीही योगदान दिले जात आहे. पहिल्या पर्वातील #36SecPlankChallenge हे आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील हृदयरोगग्रस्त मुलांच्या उपचारांशी जोडलेले होते व हा उपक्रम हृदय फाउंडेशनच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. प्लॅन्केथॉनचे पहिले पर्व नोव्हेंबर 2018 मध्ये पुणे येथे पार पडले. शिल्पा शेट्टी या उपक्रमाच्या अॅम्बेसेडर होत्या. #PlankForIndia या दुसर्या पर्वामध्ये OGQ च्या सहयोगाने युवा भारतीय ऑलिम्पिकपटूंना पाठबळ देण्यात आले. हे दुसरे पर्व 26 जानेवारी 2020 रोजी मुंबई येथे पार (Bajaj Allianz) पडले व अनिल कपूर या अॅम्बेसेडर पर्वाचे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.