Pimpri News : शहरातील 8 हजार 6 दिव्यांगांपैकी 3100 जणांचे सर्वेक्षण;  31पर्यंत नोंदणीचे आवाहन

 एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींची एकूण 8 हजार 6 एवढी लोकसंख्या आहे. त्यापैकी आज अखेरपर्यंत 3 हजार 100 इतक्याच व्यक्तींनी दिव्यांग सर्वेक्षण केल्याचे दिसून येत आहे.दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन दिव्यांग सर्वेक्षण लवकरात लवकर करून घ्यावे.31 ऑगस्टपर्यंत उर्वरीत दिव्यांग नागरीकांनी दिव्यांग सर्वेक्षण केले नाही.तर, त्यांचे देण्यात येणारे आर्थिक लाभ बंद करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती समाज विकास विभागाच्या दिव्यांक कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी दिली.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व वैश्र्विक ओळखपत्र (UDID)  देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविणे बाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार प्लेक्स, पॅम्पलेट, व्हॉटसअप व फेसबुक मेसेज, बॅनर, ऑडीओ, व्हीडीओ सी.डी., मनपाच्या डिजीटल जाहिरात फलकावर तसेच विविध माध्यमाद्वारे व्यापक प्रसिध्दी देणेत आलेली होती.

समाज ‍विकास विभागाकडून 10 मे ते 15 जूनपर्यंत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, वैश्विक ओळखपत्र (UDID), दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी करणे इ.बाबत शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.महापालिकेच्या कार्यक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींची एकूण 8 हजार 6 एवढी लोकसंख्या आहे. त्यापैकी आज अखेरपर्यंत 3 हजार 100 इतक्याच व्यक्तींनी दिव्यांग सर्वेक्षण केलेचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.