BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ‘सूर्यदत्ता’तर्फे गुरुवारी भव्य रोजगार मेळावा 

एमपीसी न्यूज – सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि फ्रेशर जॉब्स डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दिनांक २९ ऑगस्ट) सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत ‘सूर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यातून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि नोकरीची संधी मिळणार आहे. हा रोजगार मेळावा सर्वांसाठी खुला असून, यामध्ये सर्व पदवीधर, बी. ई., बी. टेक., फार्मसी, आयटीआय, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहेत.   

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीस पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये इन्फोसिस, एच.सी.एल., जिंदाल इलेक्ट्रिक, एनआयआयटी, रिलायन्स, एच. आर. ग्लोबल, टी.एस. कन्सलटिंग, टाटा स्ट्रीव्ह सस्टेनेबिलिटी, युरेका फोर्ब्स, करियर मेनेजमेंट (परदेशातील नोकरीसाठी), आदी कंपन्यांचा सहभाग असून, एचआर, फायनान्स, सेल्स, आयटी, डेव्हलपर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, बीपीओ, केपीओ आदी विभागातील पदांसाठी हा मेळावा होत आहे.

या मेळाव्यात २९ वर्षापर्यंत नवोदित आणि अनुभवी उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच या मेळाव्यातील नोकरीत विदयार्थ्यांना १२ हजार ते ४० हजारपर्यंत वेतन मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी मेळाव्याला येताना आठ ते दहा बायोडाटा सोबत आणावेत. तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी www.freshersjobfair.in या वेबसाईटर भेट द्यावी. अधिक माहितीसाठी श्रीधर ([email protected])  ९७३९३३६३३० यांना संपर्क करावा असे संयोजकांनी कळवले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like