Sushant Singh Rajput Case: मुंबईत क्वारंटाइन असलेले बिहारचे IPS विनय तिवारींची अखेर मुक्तता

Sushant Singh Rajput case: Bihar IPS officer Vinay Tiwari released from quarantine in Mumbai तिवारी हे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत आले होते.

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईला पोहोचलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्यात आले आहे. तिवारी हे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. या घटनेचे राजकीय पडसादही उमटले होते.

मुंबई महापालिकेने त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले होते. त्यानंतर मुंबईपासून ते बिहारपर्यंत यावर गोंधळ झाला. त्यानंतर बिहार सरकारने सुशांतचे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी द्यावे अशी शिफारस केली. त्यांची मागणी मान्यही करण्यात आली.

पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक असलेले तिवारी यांना क्वारंटाइन केल्यामुळे बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. स्वतः तिवारी यांनीही आपल्याला क्वारंटाइन केल्यामुळे तपासावर प्रभाव पडेल असे म्हटले होते. बिहार पोलिसांनी मुंबई पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोपही केला होता.

एक दिवस आधीच बिहारचे पोलीसच्या डीजीपींनी आपल्या अधिकाऱ्याला परत न पाठवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.