Sushant Singh Rajput : सुशांतची आत्महत्या नाही तर प्लॅन मर्डर, कंगना राणावतचा बॉलिवूडवर आरोप…पाहा व्हिडिओ!

Not Sushant's suicide but Plan Murder, Kangana Ranaut's allegations against Bollywood सुशांत सिंग राजपूत हा बॉलीवूडमध्ये जागा बनवण्यासाठी धडपडत होता. त्याला बॉलीवूड मध्ये कोणी गॉड फादर नाही त्यामुळे त्याचे चित्रपटांना पाहिजे तेवढा नावाजले गेले नाहीत त्यामुळे तो अगोदरच नैराश्याचा सामना करत होता, असे कंगना हिने एका व्हिडिओमध्ये सांगितले.

एमपीसी न्यूज – कंगना राणावत या अभिनेत्रीने बॉलीवूडवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांत सिंग राजपूत हा बॉलीवूडमध्ये जागा बनवण्यासाठी धडपडत होता. त्याला बॉलीवूड मध्ये कोणी गॉड फादर नाही त्यामुळे त्याचे चित्रपट पाहिजे तेवढे नावाजले गेले नाहीत, त्यामुळे तो अगोदरच नैराश्याचा सामना करत होता, असे कंगना हिने एका व्हिडिओमध्ये सांगितले.

कंगना म्हणाली आहे की, सुशांत सिंगला जेव्हा कमजोर म्हणून हिणवले जाते तेंव्हा हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की, तो एक रँक होल्डर होता. एवढा हुशार माणूस कमजोर असेल, असे का म्हणता?

तसेच त्याला त्याच्या पदार्पणाच्या सिनेमासाठी कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर ‘छिछोरे’सारख्या सिनेमालासुद्धा डावलण्यात आले, आणि गली बॉय सारख्या कमी दर्जाच्या सिनेमाला पुरस्कार देण्यात आला.

सुशांत सिंगवर तो ड्रग वगैरे करायचा, नाश करायचा असा आरोप केला जातो. पण, संजय दत्त जेंव्हा नाश करतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते आणि इतरांच्यावर आरोप केले जातात असे का, असा प्रश्न देखील तिने उपस्थित केला आहे.

सुशांत सिंग सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याचे सिनेमे पाहण्यासाठी लोकांना विनंती करायचा. बॉलीवूडने त्याला त्याच्या कठीण काळात कधीच मदत केली नसल्याचे कंगना म्हणाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.