Tragedy: ‘फेल्युअर से कैसे डील करना है, कोई बात ही नहीं करना चाहता’, शेवटी हेच खरं ठरलं…

Sushant Singh Rajput's chhichhore movie quotes चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात असे फेल्युअर चालत नाहीत असेच कदाचित त्याला वाटले असेल.

एमपीसी न्यूज- लहान वयात चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमावणा-या सुशांतसिंह राजपूत या गुणी अभिनेत्याची दुर्दैवी अशी एक्झिट सर्वांनाच चटका लावून गेली आहे. पाटण्यासारख्या शहरातून मायानगरी मुंबईत येऊन स्वत:ला सिद्ध करणे सोपे नसते.

मात्र सुशांत स्ट्रगल करत यशाच्या शिखरावर पोहोचला होता. वेगवेगळ्या विषयांचे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्याने दिले. मात्र चित्रपटात येण्यापूर्वी सुशांत दिल्लीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. ते अर्ध्यावर सोडून त्यानं अभिनयात पदार्पण केलं होते.

अत्यंत हुशार असलेल्या सुशांतने २००३ मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत देशातून सातवा क्रमांक मिळवला होता. सुशांत दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (आता दिल्ली टेक्निकल विद्यापीठ)मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता.

तिसऱ्या वर्षी सुशांतने शिक्षण सोडून आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. विशेष म्हणजे सुशांतने आयएसएम धनबादसह इंजिनिअरिंगच्या तब्बल ११ परीक्षा पास केल्या होत्या. तसेच तो फिजिक्समध्ये नॅशनल ऑलिंपियाडचा विजेताही होता.

सुशांतचा ‘छिछोरे’ हा एक वेगळ्या विषयावरील चित्रपट होता. या चित्रपटातील एक डायलॉग प्रसिद्ध झाला होता.

“सक्सेस के बाद का प्लॅन सब के पास है. लेकिन अगर गलती से फेल हो गये, तो फेल्युअर से कैसे डील करना है, कोई बात ही नहीं करना चाहता, मात्र दैवदुर्विलास असा की या चित्रपटाच्या माध्यमातून तरुणाईला हा संदेश देणारा सुशांत व्यक्तिगत आयुष्यात आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलताना हे सगळं विसरला.

लौकिकार्थाने ज्याला फेल्युअर म्हणता येईल असे त्याच्या आयुष्यात कदाचित काही नसेलही. पण असं म्हटलं जातं की मागील काही दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता.

चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात असे फेल्युअर चालत नाहीत असेच कदाचित त्याला वाटले असेल. या मायावी दुनियेत सगळं चकचकीत असतं. पण या चकाचौंधमध्ये सुशांत मात्र एकटाच होता हे त्याच्या आत्महत्येने दाखवून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.