Sushantsingh Rajput: चित्रपटातून सुशांतची कमाई किती? ईडीकडून टॅलेंट मॅनेजर जयंतीकडे चौकशी

Sushantsingh Rajput: How much did Sushants earn from the film? Inquiry from ED to Talent Manager Jayanti ईडीने रिया चक्रवर्तीपासून ते तिच्या भावापर्यंत, अनेक जणांची कित्येक तास चौकशी केली आहे.

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सर्वांचे लक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. तर दुसरीकडे ईडीची चौकशी सलगपणे सुरु आहे. ईडीने रिया चक्रवर्तीपासून ते तिच्या भावापर्यंत, अनेक जणांची कित्येक तास चौकशी केली आहे. आता सुशांतसिंहची टॅलेंट मॅनेजर जयंती साहा हिचीही ईडीने चौकशी केल्याचे वृत्त समोर आले आहे.

जयंती साहा टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वॉनशी (Kwan) निगडीत आहे. त्या सुशांतचे अकाऊंट हँडल करत होत्या. त्यांच्या एजन्सीमार्फत सुशांतला अनेक चित्रपटात कामही मिळाले होते. आता ईडीने गुरुवारी (दि.14) दुपारी जयंती यांना चौकशीसाठी बोलावले होते. ही चौकशी सुमारे 12 तास चालल्याचे बोलले जाते.

चौकशीदरम्यान त्यांच्या एजन्सीमार्फत सुशांतला मागील वर्षी आणि यावर्षी किती प्रोजेक्ट मिळाले होते, अशा प्रकारच्या प्रश्नांची विचारणा करण्यात आली. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार क्वान एजन्सीने सुशांतच्या अकाऊंटवरुन 60 लाखांचे व्यवहार झाले होते. या व्यवहारावरुनही ईडीने जयंती यांना प्रश्न विचारल्याचे सांगण्यात येते.

ईडीची ही चौकशी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानले जाते. कारण या माध्यमातून सुशांतला चित्रपटातून किती कमाई होते, याचा अंदाज लावता येणार आहे. त्याचबरोबर त्याला कोणत्या-कोणत्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, हेही समजणार आहे.

जयंती साहा यांनी सुशांतशिवाय इतर अनेक सेलिब्रेटिंसाठी काम केले आहे. त्यांनी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणसारख्या सेलिब्रेटिंसाठी काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.