Sushant singh suicide: ‘पण तो तर आजही आपल्या मनात आहे’…

Sushant singh suicide: 'But he is still in our minds'! 'ज्यावेळी मी निर्वाणला तुझा मामा या जगात नाही असं सांगितलं, तेव्हा तो पटकन निरागसपणे बोलून गेला...'पण तो तर आपल्या मनात आजही आहे'! हे एकच वाक्य तो सलग तीन वेळा म्हणाला.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास लावून  आत्महत्या केली. त्यानंतर सुशांतने हा टोकाचा निर्णय का घेतला असावा याचा काहीच उलगडा झाला नाही. त्याने नैराश्यातून आपले जीवन संपवले असावे असेच सकृतदर्शनी दिसते आहे.  

मात्र, त्याच्या या निर्णयाने  कुटुंबीय धक्क्यातच आहेत. सुशांतची एक बहीण श्वेता सिंह कीर्ती अमेरिकेत राहते. तिची अंत्यसंस्कारांना येण्याची खूप इच्छा होती. पण ती येऊ शकली नाही.

मात्र, सुशांतच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिच्या लहान मुलाने तिची कशी समजूत काढली याविषयीची मनाला चटका लावणारी पोस्ट तिने शेअर केली आहे. सुशांतच्या निधनाचं वृत्त कळताच श्वेताच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती रडू लागली. यावेळी तिच्या बाजूला असलेल्या तिच्या लहान मुलाला तिने ‘आता तुझा मामा या जगात नाही’, असं सांगितलं.

‘ज्यावेळी मी निर्वाणला तुझा मामा या जगात नाही असं सांगितलं, तेव्हा तो पटकन निरागसपणे बोलून गेला…’पण तो तर आपल्या मनात आजही आहे’! हे एकच वाक्य तो सलग तीन वेळा म्हणाला.

जर एक पाच वर्षाचा मुलगा असं बोलत असेल तर विचार करा आपल्याला किती धीराने रहायला हवं. तुम्ही सगळे धीराने या प्रकाराला समोरं जा. खासकरुन सुशांतचे चाहते. हे लक्षात घ्या तो आपल्या मनात कायम आहे आणि या पुढेही असेल. कृपया असं काही करुन नका, ज्यामुळे त्याला वाईट वाटेल, त्याला आवडणार नाही’, अशी पोस्ट श्वेताने केली.

सुशांत सिंहच्या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर त्याच्या काही चाहत्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे. तसेच बिहारमध्ये शोकप्रदर्शन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे अशा चाहत्यांसाठी श्वेताने ही खास पोस्ट शेअर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.