Chikhali : साने चौकात युवकाचा संशयास्पद मृत्यू

एमपीसी न्यूज – चिखली मधील साने चौकाजवळ एका 35 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली.

राजू राठोड (वय 35, रा. मोरेवस्ती) असे मृतावस्थेत आढळलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साने चौकाजवळ एका युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून चिखली पोलिसांना मिळाली. चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मयत व्यक्तीने मद्य प्राशन केले होते. तसेच त्याचा खून झाला असल्याची शक्यता आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.