Chikhali : नेवाळेवस्ती येथे बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने घबराट

एमपीसी न्यूज – चिखलीच्या नेवाळेवस्ती भागात काही नागरिकांना ऊसाच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत पोलीस व वन खात्याला माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

परिसरातील रहिवासी श्रीयश सेतसंदी यांनी ‘एमपीसी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, चिखलीच्या नेवाळे वस्ती भागात ऊसाच्या पिकात स्थानिक नागरिकांना बिबट्या सदृश प्राणी आढळला असून, सदर घटना पोलीस व वन्य विभागास कळविण्यात आली आहे तसेच सदर ठिकाणी पोलीस खात्यातर्फे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. परिसरात गस्त वाढवली आहे.

वन विभागाचे अधिकारी अद्यापि घटनास्थळी पोहचले नसून ‘तो’ प्राणी बिबट्याच असल्याबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

काही दिवसांपूर्वी चऱ्होली भागात बिबट्या दिसल्याची चर्चा होती, तथापि तो बिबट्या नसून तरस असल्याचे सखोल पाहणीनंतर स्पष्ट झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.