Pune : राम कदमांना निलंबित करा अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही – राधाकृष्ण विखे

एमपीसी न्यूज – भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले विधान माता-भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर विधानसभेचे आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज पुण्यात आहे. पुण्यातील आठही मतदार संघात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा फिरणार आहे. यानिमित्ताने पुण्यात काँग्रेस पक्षाच्या उभारी देण्याचे काम काँग्रेसचे नेते करणार आहेत.

दरम्यान, घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी राम कदम यांच्यावर टीका केली. त्यांना आमदार पदावरून काढून टाका, असे मुख्यमंत्र्यांना आव्हानही करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.