Pune News : पालिकेच्या विद्युत विभागातील दोन कनिष्ठ अभियंत्यांचे निलंबन

एमपीसी न्यूज : दिलेली जबाबदारी योग्य पपार पाडली नाही, असा ठपका ठेवत महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी विद्युत विभागातील दोन कनिष्ठ अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

शहरात वाढत कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.   याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या लायगुडे आणि खेडेकर रुग्णालयात बेड वाढवण्यासोबतच ऑक्सिजन सिंलेंडरची व्यवस्थाकरण्याचे काम सुरू आहे. बेडची व्यवस्था आरोग्य विभाग तर अ‍ॅक्सिजनची जबाबदारी विद्युत विभागावर टाकण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

लायगुडे रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडरची जबाबदारी विद्युत विभागाने याग्य प्रकारे निभावली नसल्याचा ठपका ठेवत अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी विद्युत विभागातील दोन कनिष्ठ अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली.

मात्र, विद्युत विभागाने आमच्या लोकांनी योग्य प्रकारे काम केले आहे, कामात कोठेही चुक केलेली नाही, असा खुलासा केला आहे. उलट आरोग्य विभाग आपली जबाबदारी आमच्यावर टाकत असल्याचा आरोप करत कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय पालिकेतील अभियंता संघाने काळ्या फिती लावून काम करत कारवाईचा निषेध केला. तसेच याबाबतचे निवेदन अभियंता संघाने महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्तांना दिले आहे.

दरम्यान कोरोनाच्या कामासाठी नियुक्ती करूनही कामावर न जाणार्‍या 13 कर्मचार्‍यांना अति. आयुक्त अग्रवाल यांनी निलंबीत केले होते. या कर्मचार्‍यांचे खातेनिहाय चौकशी करण्याचेही आदेश दिले होते. मात्र, चौकशी होण्यापूर्वीच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.