Pune Crime : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून, गळफास घेऊन पतीचीही आत्महत्या

एमपीसी न्यूज : चारित्र्यावर संशय घेऊ पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदन नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिराजी नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. उषा योगेश गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर योगेश तानाजी गायकवाड (वय 33) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, उषा गायकवाड या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. तर काहीही कामधंदा नसल्यामुळे योगेश घरीच बसून असायचा. चारित्र्याच्या संशयावरून या दोघात सारखे वाद होत होते. सोमवारी रात्री ही त्यांच्यात याच कारणावरून पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. घरात दोन्ही मुले झोपली असताना योगेश गायकवाड यांनी गडावरून पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी जेव्हा दोन्ही मुले झोपेतून उठली तेव्हा त्यांना वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले तर आई निपचित पडली असून तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या दोघांच्याही लग्नाला तेरा वर्षाचा कालावधी लुटला होता. दहा आणि आठ वर्षांची दोन मुले देखील त्यांना आहेत. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.