Sangvi : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय, पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पती व सासूवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

34 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती राम मनोहर साळुंखे (वय-35), सासू विमल मनोहर साळुंखे (वय-58, रा. कुंजीर सदन, मुंजोबा चौक, पिंपळे-सौदागर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांच्या चारित्र्यावर आरोपी पती व सासूने संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पती दारू पिऊन त्यांना वारंवार मारहाण करत होता. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.