Bharat Vikas Parishad Quiz Competition: सरस्वती विद्यामंदिरचे भारत विकास परिषदेच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुयश

एमपीसी न्यूज : भारत विकास परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ‘भारत को जानो’ या विषयावर सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक विभागातील ईश्वरी पंडित व समीक्षा बिराजदार या दोन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

निगडी येथे झालेल्या स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक येऊन सांगली येथे झालेल्या प्रांतस्तरीय स्पर्धेमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. तिथेही त्यांचा प्रथम क्रमांक येऊन क्षेत्रीय स्तरावर अंधेरी येथे झालेल्या स्पर्धेत त्या सहभागी झालेल्या होत्या तेथे त्यांचा तृतीय क्रमांक आला असून प्रत्येक वेळेस त्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रक, मेडल आणि ट्रॉफी मिळाली आहे. त्याचप्रमाणे शाळेला देखील त्यांनी तीन ट्रॉफीज मिळवून दिलेल्या आहेत.

Electricity Bill Payment Centre: शनिवार रविवार सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

त्याबद्दल त्या दोन्ही विद्यार्थिनीचे सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी ,कार्यवाह प्रमोद देशक, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे ,शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर, खजिनदार सौ सुचित्रा चौधरी, सदस्य विश्वास देशपांडे ,सुनील आगळे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सौ सुरेखा रासकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.