Pune News : ‘स्वच्छ’च्या कर्मचाऱ्यांना मिळणार मदर बॅग, स्कार्फ आणि पादत्राणे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील ‘स्वच्छ सेवा संस्थे’च्या कचरा वेचकांना मदर बॅग, पादत्राणांचे जोड आणि स्कार्फ पुरविण्यासाठी 47 लाख 51 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या निर्णयामुळे स्वच्छ सेवा संस्थेच्या कचरा वेचक कर्मचाऱ्यांना 86 हजार 400 मदर बॅग, तीन हजार चारशे पादत्राणांचे जोड आणि सात हजार दोनशे स्कार्फ उपलब्ध होणार आहेत. त्याचा उपयोग या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेसाठी होणार आहे

बावधन खुर्द येथील ई-लर्निंग स्कूलच्या कामासाठी निधी मंजूर

बावधन-कोथरुड डेपो क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत बावधन खुर्द येथे ई-लर्निंग शाळेचे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी 1 कोटी 72 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.