Swachh Survekshan 2020: स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पुणे शहर भारतात 15 वे तर, महाराष्ट्रात चौथे

Swachh Survekshan 2020: In Swachh Survey 2020, Pune city is 15th in India and 4th in Maharashtra आम्ही पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, 15 व्या स्थानावर आलो.

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पुणे शहर भारतात 15 वे तर, महाराष्ट्रात चौथे आले आहे. मागील वर्षी आपला भारतातील क्रमांक 37 वा होता, अशी माहिती कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी गुरुवारी दिली.

आम्ही पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, 15 व्या स्थानावर आलो. केंद्र सरकारतर्फे जानेवारी महिन्यात याचे सर्वेक्षण होत असते. नागरिकांचा सहभाग यामध्ये अतिशय महत्वपूर्ण आहे.

थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होऊन याचे रँकिंग केले जाते. 4 जुलै रोजी केंद्र सरकारने कॅटेगरी जाहीर केली आहे. त्यामध्ये यावर्षीचे स्वच्छ सर्वेक्षण कसे असेल, हे सांगितले आहे.

कचरा व्यवस्थापन 2016 कायद्याची अंमलबजावणी प्रत्येक शहराने करणे अपेक्षित आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पुणे शहर भारतात 15 वे तर, महाराष्ट्रात चौथे आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देत असल्याचे ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. आगामी काळात पाहिल्या 5 मध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.