Pune : नाटकातून स्वामी समर्थ पुणेकरांच्या भेेटीला

एमपीसी न्यूज – पुणेकर रसिक प्रेषकांना आणि स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थांचा महीमा थेट रंगमंचावर पाहण्याची संधी रंगोदय पुणे या नाट्यसंस्थेने उपलब्ध करुन दिली आहे. शनिवार दि. १३ आँक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ वा. श्री स्वामी समर्थांच्या अमृतमय जीवनावरील भक्तीमय महानाट्याचा शुभारंभ भरत नाट्य मंदीर पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

नाटकात स्वामींचे निस्सिम होवून गेलेले भक्त बसप्पा, बाळाप्पा, चोळप्पा तसेच सुंदराबाई , चिंतोपंत टोळ यांच्याशी असलेले भक्तीमय नाते उलगडुन दाखविण्यात आले आहे. अनेक चमत्कार व हितोपदेश स्वामींनी समाजाला दिलेले आहे. ते प्रत्यक्ष पाहण्याची संधीच जणु रसिक प्रेक्षक आणि स्वामी भक्तांना मिळणार आहे. नाटकाचे लेखन गौरव देशपांडे यांनी केले असुन दिग्दर्शन संतोष ढेबे यांनी केले आहे. नाटकाच्या निर्मितीची धुरा कल्पना बेंगरुट व गणेश कुंजीर या स्वामी भक्तांनी पेललीय.

नाटकात ऋतुजा भट , दिपीका साळुंके, कल्पना बेंगरुट, सारिका दिक्षीत, अनिकेत केदार, अभिषेक बाष्टे, अभिलाष पाटील,विनायक रायकर, निरज अंबुले, चिरंजीवी नाटेकर, भूषण पाटील, बालकलाकार आस्था अवताडे, व रुग्वेद मुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत तर श्री स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका रंगोदय पुणेचे तरुण कलाकार अक्षय इंगळे यांनी साकारली आहे , प्रसिद्ध रंगभूषाकार माधव थत्ते यांनी रंगभूषा तर संगीत संयोजन अभिजीत इनामदार यांनी केल आहे.तरी भक्तीरसात न्हावुन निघण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी व स्वामी भक्तांनी आर्वजुन पाहावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.