Pimpri News : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन 

एमपीसी न्यूज : शरद नगर चिखली येथील स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय (Pimpri News) व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. हि व्याख्यानमाला दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या तीन दिवशी सायंकाळी 7 वा स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान शरद नगर स्पाईन रोड सेक्टर-19 चिखली या ठिकाणी होईल.

या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी हे “स्वामीजींच्या बहिणी भगिनी निवेदिता” यांच्याविषयी व्याख्यान देणार आहे. यावेळी माजी नगरसेविका मंगला कदम, योगिता नागरगोजे, साई हायस्कूलचे संचालक शिवलिंग ढवळेश्वर, डॉ भावार्थ देखणे, निलेश नेवाळे, राजेंद्र घावटे हे उपस्थित राहणार आहे.

दुसऱ्या दिवशी – 11 जानेवारी रोजी “भारतीय संस्कृती आणि आजचा तरुण”या विषयावर प्रसिद्ध युवा व्याख्याते अविनाश भारती यांचे व्याख्यान होईल.यावेळी माजी नगरसेवक संजय नेवाळे, ज्ञानेश्वर तापकीर,सचिन सानप भास्कर रिकामे, सतीश मोटे, श्याम कुंभार आदी उपस्थित राहणार आहे. (Pimpri News) यावेळी कृष्णा नगर येथील मयूर हॉस्पिटलमध्ये 10 वा. रोटरी क्लबच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे.

Pune News : डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्व अधिक – रिझवान शेख

तिसऱ्या दिवशी 12 जानेवारीला स्वामीजींच्या जयंती दिवशी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे “आपली आपणच करा सोडवणूक” याविषयावर व्याख्यान देतील. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद या नावाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे, पोलीस अधीक्षक डॉ दिगंबर प्रधान, नवी मुंबईचे उपयुक्त नितीन काळे, टाटा मोटर्स चे कार प्लांटचे हेड श्याम सिंग, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, माजी नगरसेवक एकनाथ पवार, सुनील लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या गेली अनेक वर्षापासून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विवेकानंदांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याची माहिती स्वामी विवेकानंद लोकसेवा (Pimpri News) प्रतिष्ठानचे रामराजे बेंबडे यांनी दिली. कार्यक्रम आयोजनासाठी सुनील पंडित, मिलिंद वेल्हाळ, महेश मांडवकर, संतोष ठाकुर, शंकरराव बनकर, पंढरीनाथ म्हस्के, सुनील खंडाळकर, देवराम मेदनकर, दिलीप मांडवकर,अशोक हड़के यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.