Swami Vivekananda Lecture : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता युवा पिढीने  जागरूक राहणे गरजेचे – जे. साई दीपक

एमपीसी न्यूज – देशाच्या विविध भागात देशविरोधी शक्ति कार्यरत असल्याचे लक्षात घेता युवा पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे असे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील वकील जे. साई दीपक यांनी केले. ते यावेळी भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत (Swami Vivekananda Lecture) बोलत होते.

या कार्यक्रमात जे. साई दीपक लिखित ‘इंडिया भारत आणि पाकिस्तान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, माजी खासदार प्रदीप रावत, नाट्य चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर उपस्थित होते.

जे. साई दीपक म्हणाले की, ”देश विरोधी शक्तींना काहीजण मदत करीत आहेत, तर काही शक्ति धुसखोरी करीत आहे. हे आपण वेळीच ओळखले पाहिजे. त्यासाठी युवा पिढीने सतर्क राहायला हवे. देशाच्या संस्कृती रक्षणासाठी आजवर दोन पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यामध्ये भारत ट्रायोलॉजी आणि इंडिया दॅट इज भारत या पुस्तकांचा समावेश आहे. तर, आता तिसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. तसेच, जे. साई दीपक यांनी उपस्थित असणार्‍या युवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक ऊत्तरे दिली. यावेळी सोलापूरकर यांनी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

माजी सनदी अधिकारी धर्माधिकारी (Swami Vivekananda Lecture) यांनी देशासमोरील विविध आव्हानांचा उल्लेख मनोगतात केला. ते म्हणाले, देशासमोर असणार्‍या विविध आव्हानांमधे आपली संस्कृती, परंपरा, नागरिकत्व आणि जागतिक स्तरावरील अशी आव्हाने आहेत. याला आपण सर्वांनी समर्थपणाने आणि संघटित पणाने सामोरे जाण्याची गरज आहे. माजी खासदार रावत यांनी सांगितले की, आपण आपली संघटित शक्ति वेळीच ओळखून देशाच्या बळकटीसाठी प्रयत्नशील असायला हवे. ही काळाची गरज आहे.

Bhavani Peth : पुण्यात व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे गजाआड

परिषदेचे वरिष्ठ सदस्य देवदत्त चंदावरकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये परिषदेच्या कार्याची तसेच विविध उपक्रमांची माहिती सांगितली. भारत विकास परिषद ही समाजसेवी संस्था असून देशभरात परिषदेच्या बाराशे शाखा कार्यरत आहेत. देशाची नवी पिढी सुसंस्कृत देशभक्त आणि मूल्यधिष्टीत होण्यासाठी विविध उपक्रम परिषदेच्या माध्यमातून करण्यात येतात असे ते म्हणाले.

शिवाजीनगर शाखा अध्यक्ष मंदार जोग यांनी आभार तर मधुरा जोग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.