Swara Murder Case : वडगाव येथे स्वराच्या हत्येचा ‘कॅन्डल मार्च’द्वारे निषेध व सामूहिक श्रद्धांजली!

एमपीसी न्यूज – कोथुर्णे येथील सात वर्षीय स्वरा चांदेकर (Swara Murder Case) या बालिकेचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील मोरया महिला प्रतिष्ठान, मोरया ढोल पथक व ग्रामस्थांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, माजी उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा चेतना ढोरे, उद्योजक राजेश बाफना, अतुल वायकर, अतुल राऊत, विवेक गुरव, सचिन कडू, मंगेश खैरे, शरद ढोरे, सिद्धेश ढोरे, दिनेश पगडे आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या, मोरया ढोल पथकाचे सदस्य तसेच वडगाव शहरातील नागरिक, महिला भगिनी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ecobricks Activity : सांगवडे ग्रामपंचायत व रोटरी क्लबचा इकोब्रिक्स उपक्रम; गावातील प्लॅस्टिकचा राक्षस बाटलीबंद होणार

या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी ही केस जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावी. तसेच, शासनाने या आरोपीला अतिशय कडक शासन करावे. जेणेकरून या विकृत प्रवृत्ती अशी कृत्ये करण्यास धजावणार नाहीत, अशी मागणी नगराध्यक्ष मयुर ढोरेसह पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.  चिमुकली स्वरा हिच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च मोर्चात शहरातील नागरिकांनी सहभाग घेऊन तीव्र निषेध नोंदवला. तसेच या बालिकेला (Swara Murder Case) सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.