Pune : स्वारगेट – कात्रज मेट्रो मार्गावर 2027 पर्यंत 95 हजार प्रवासी

एमपीसी न्यूज – स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गावर 2027 पर्यंत 95 हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील. या संदर्भातील सर्वेक्षण महामेट्रोने केले आहे.

2057 पर्यंत ही प्रवासी संख्या दुप्पट म्हणजेच 1 लाख 97 हजार होणार आहे. साडेपाच किलोमीटर हा मेट्रो मार्ग भूयारीच असेल. वरून (यलोव्हेटेड) मेट्रो जाणे शक्य नाही. या मार्गावर केवळ तीनच स्टेशन आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या धनकवडी – बालाजीनगर भागात स्टेशन नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या मेट्रो मार्गासाठी सुमारे 4 हजार 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. पुणे शहराच्या चारही बाजूंनी मेट्रोला मागणी वाढती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.